सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात फुटजवळगाव हे गाव वसलेले आहे. गावात असलेल्या लोकसहभाग,गावातील एकी यामुळे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली आहे . गावाला जिल्ह्यामध्ये विशेष महत्व प्राप्त झाले आहे. फुटजवळगाव गावाची सर्वसामान्य माहिती खालील प्रमाणे
जिल्हा सोलापूर
तालुका माढा
प्रमुख वाड्या वस्त्या गावठाण
शेतात
लोकसंख्या (२०११) ११५३
गावाचे एकूण क्षेत्रफळ २९९.७२ हेक्टर
शेतीखालील क्षेत्रफळ ९५.७२ हेक्टर
निवासी वापराखालील क्षेत्रफळ ३.५ हेक्टर
प्रमुख व्यवसाय शेती,दुग्धव्यवसाय,नोकरी, उद्योगधंदे इ.
२.१ प्रादेशिक वाहतूक व दळणवळण
फुटजवळगाव हे गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात वसलेले आहे. हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाहून ११९ किमी अंतरावर आहे. टेंभूर्णी,अकलुज, करमाळा , इंदापूर ,कुर्डूवाडी ही फुटजवळगाव जवळील काही प्रमुख गावे/शहरे आहेत. कुर्डूवाडी (३० किमी ) व पंढरपूर (५५ किमी) ही नजीकची रेल्वे स्टेशन आहेत. विमान सेवेसाठी पुणे (१७१ किमी) व सोलापूर (११९ किमी) या विमानतळावर अवलंबून राहावे लागते.
२.२ लोकसंख्येचा तपशील :
सन २००१ च्या जनगणनेनुसार फुटजवळगाव गावची लोकसंख्या ९१०होती, तर २०११ च्या जनगणनेनुसार११५३ झाली. तर सन २०२३ साली ११९५ झाली. ही लोकसांख्येतील वाढ गावातीलवाड्यावस्त्यांचाविस्तार, गावातील मुबलक पाणीसाठा आणि कुशलव मुबलक रोजगार निर्मितीमुळेझाली असावी असा अंदाज वर्तविलाजात आहे.
तक्ता क्रमांक २ :- फुटजवळगाव गावची लोकसंख्या (२०११)
एकूण लोकसंख्या (२०११) ११५३
पुरुष लोकसंख्या ५९५
स्त्री लोकसंख्या ५५८
स्त्री/पुरुष प्रमाण
गेल्या दशकात गावच्या लोकसंख्या वाढीचा दर वाढला आहे. २००१ ते २०११ या दरम्यान गावची लोकसंख्या ११५३ वरुन ११९५इतकी म्हणजे २०% वाढली आहे. जनगणनेनुसार गावात एकूण १९० घरे असून कुटुंबातील सरासरी सदस्य संख्या ५ इतकी आहे.